इटलीचे नव वास्तववादी चित्रपट दिग्दर्शक फ्रान्सेस्को रोझी (वय ९२) यांचे येथे निधन झाले. अनेक टीकात्मक माहितीपट त्यांनी तयार केले होते. १९६२ मध्ये साल्वातोर गिलियानो या सिसिलियन गँगस्टरवर त्यांनी चित्रपट काढला होता, त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा मिळाली.
 त्यानंतर दहा वर्षांनी त्यांनी ‘द मटेई अफेअर’ हा चित्रपट काढला. इटालियन तेल व्यापाऱ्याच्या गूढ मृत्यूची ती कहाणी होती. या चित्रपटाला कानमध्ये मान्यता मिळाली होती.