नंदा देवी शिखरावर हिमस्खलनामुळे बर्फाखाली दबून मरण पावलेल्या आठ गिर्यारोहकांचे मृतदेह बाहेर शोधण्यासाठी इंडो- तिबेट सीमा पोलीस दलाची (आयटीबीपी) २० हजार फुट उंचीवरील सर्वात जास्त धाडसी अशी मोहीम सुरू झाली आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता या मोहिमेसाठी इंडो-तिबेट सीमा दलाच्या चार प्रशिक्षित गिर्यारोहकांनी वायु सेनेच्या पाच जवानांसोबत मुनस्यारी येथुन हॅलिकॅाप्टरद्वारे प्रस्थान केले.
https://twitter.com/ANI/status/1136191336552550401
भारतीय सेनेच्या चॅापर विमानांनी सोमवारी नंदा देवी शिखराच्या उतारावर पाच जणांचे मृतदेह पाहिले होते. खरेतर हे विमान मागिल आठवड्यात हिमस्खलनानंतर बर्फाखाली दबलेल्या चार ब्रिटिश, दोन अमेरिकन, एक ऑस्ट्रेलियन व एका भारतीयाच्या शोधासाठी निघाले होते. याशिवाय अन्य तीन जणांचे मृतदेह देखील शिखराच्या आसपास दबले गेले असल्याची शक्यता आहे. हे सर्व गिर्यारोहक त्या गटाचे सदस्य होते ज्याचे नेतृत्व अनुभवी ब्रिटिश गिर्यारोहक मार्टिन मोरन हे करत होते. हे सर्वजण नंदा देवी शिखराच्या पुर्व भागात चढाईसाठी गेले होते.
https://twitter.com/ANI/status/1136122353090347008
‘आयटीबीपी’ चे प्रवक्ता विवेक कुमार यांनी सांगितले की आयटीबीपीच्या गिर्यारोहकांना हॅलिकॅाप्टरद्वारे १८ हजार ते २० हजार फुट उंचीवर उतरवण्यात आले आहे. ही मोहीम अत्यंत जोखीमची व अतिउच्च अशा ठिकाणची आहे. या ठिकाणी अनेकदा हिमस्खलन होत असते.
१२ सदस्य असलेले गिर्यारोहाकांचे पथक १० मे ते १५ मे दरम्यान चढाईच्या मोहिमेवर होते, या दरम्यान यापैकी आठ गिर्यारोहक बेपत्ता झाले होते. तर उर्वरीत चौघे बेस कॅम्पला परतले होते. त्यांनीच त्यांचे अन्य सहकारी बेपत्ता झाल्याची माहिती आयटीबीपीला दिली. त्यानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आली.