जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. सध्या परिसरात नाकेबंदी करुन शोधमोहीम सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे शोपियान जिल्ह्यातील जैनापुरा परिसरात ही चकमक झाली. परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे शोधमोहीम राबवण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजुंनी गोळीबाराला सुरूवात झाली आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं.परिसरात अजून दहशतवादी लपल्याच्या शक्यतेमुळे शोधमोहीम सुरू आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळखही पटली आहे.


दरम्यान, यापूर्वी शनिवारी दुपारी शोपियान जिल्ह्यातच दहशतवाद्यांनी तीन युवकांचं अपहरण करुन एकाची हत्या केली होती आणि अन्य दोघांना सोडून देण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir shopian encounter two terrorists killed
First published on: 18-11-2018 at 08:41 IST