श्रीनगरमधील छानापोरा भागात तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून, त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, परिसरात जवानांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न; एकाला कंठस्नान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अगोदर भारतीय लष्कराने जम्मू -काश्मीरच्या पुंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला होता. पहाटे लष्कराला नियंत्रण रेषेजवळ तीन ते चार दहशतवाद्यांचा एक गट दिसला. त्यांच्यापैकी एक जण सीमा ओलांडून भारतात शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात तो घुसखोर ठार झाला होता.