नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसनं जितू पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर, उमंद सिंगार यांना विरोधी पक्षनेते केलं आहे.

काँग्रेसनं पत्रक काढत ही माहिती दिली आहे. त्यात म्हटलं, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जितू पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचं कार्य कौतुकास्पद होतं. तसेच, विरोधी पक्षनेतेपदी उमंग सिंगार आणि विधानसभेतील काँग्रेस पक्षाच्या उपनेतेपदी हेमंत कटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”

bhiwandi east mla rais shaikh resigns
समाजवादी पक्षात भिवंडीवरून धुसफुस; रईस शेख यांचा पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा
bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
Nirmala Sitharaman
कर्नाटकात घराणेशाही काँग्रेससाठी अडचणीची? आठ मंत्र्यांची मुले रिंगणात
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी

राहुल गांधींच्या जवळील नेते मानले जातात पटवारी

जितू पटवारी २०१३ साली पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले होते. पटवारी सध्या काँग्रेस सचिव आणि गुजरातचे प्रभारी आहेत. मध्य प्रदेशच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरही पटवारी यांनी काम केलं आहे. जितू पटवारी हे राहुल गांधींच्या जवळील नेते मानले जातात.

हेही वाचा : मध्य प्रदेशमध्ये महिलाशक्ती भाजपची तारणहार!

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पटवारी राऊ मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांच्याविरोधात भाजपानं मधु वर्मा यांना उमेदवारी दिली होती. पण, पटवारींनी वर्मांचा पराभव केला. तसेच, २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पटवरींनी मधु वर्मांचा ५ हजार ७०३ मतांनी पराभव केला होता.

छत्तीसगडमध्ये चरणदास महंत विरोधीपक्षनेते

दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये दीपक बैज यांना प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आलं आहे. तर, छत्तीसगड विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी चरणदास महंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : विश्लेषण: ‘लाडली बहनां’चा मामा; मध्य प्रदेशातील यशाचे शिल्पकार शिवराजसिंह चौहान!

मध्य प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव

काही दिवसांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक काँग्रेसनं कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत. यातील १६३ जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला होता. तर, काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले होते.