जम्मू काश्मीरमध्ये नोंदणी नसलेली प्रसारमाध्यमे सरकारविरोधात बातम्या देत आहेत. अशा प्रसारमाध्यमांवर कारवाई करण्याची मागणी जम्मू काश्मीरचे दंडाधिकारी डीएम रामबन यांनी केली आहेत. रामबन यांनी पोलीस अधीक्षकांना याबाबत पत्रही लिहले आहे.

काही अनाधिकृत आणि नोंदणी नसलेले प्रसारमाध्यमे जम्मू काश्मीर सरकारविरोधात सोशल मीडियावर बातम्या पसरवत आहे. मुख्यत फेसबुकवरून अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यात येत असल्याचा आरोप रामबन यांनी केला आहे.

पत्रकारांचीही चौकशी करण्यात यावी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधीकृत नोंदणी नसलेले असे बनावट मीडिया गट ओळखण्यात यावेत. तसेच पत्रकारितेतील कोणतीही पदवी, पात्रता किंवा परवानगी न घेता अनाधिकृतपणे पोर्टल चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रामबन यांनी केली आहे. एवढचं नाही तर अशा बनावट प्रसारमाध्यमांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांचीही चौकशी करण्यात यावी आणि अशी प्रसारमाध्ये चालवण्यासाठी लागणारा निधी कोणत्या मार्गाने उभा केला जातो याची चौकशी करण्याचीही मागणी रामबन यांनी पत्राद्वारे केली आहे.