ब्रिटनचे ख्यातनाम पत्रकार व भारतातील माजी उच्चायुक्त जॉन फ्रीमन (वय ९९) यांचे निधन झाले. त्यांची कारकीर्द चतुरस्र होती. बीबीसीवर ते फेस टू फेस हा कार्यक्रम सादर करीत असत. भारतात १९६५ ते १९६८ दरम्यान हॅरॉल्ड विल्सन यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत ते राजदूत होते. न्यू स्टेटसमन मासिकाचे ते संपादक होते तसेच मजूर पक्षाचे खासदार होते. अमेरिकेतही ते राजदूत होते व लंडन विकएंड टेलिव्हिजनचे अध्यक्ष होते. मार्टिन ल्यूथर किंग व बट्राँड रसेल यांच्या मुलाखती त्यांनी त्यांच्या खास शैलीत घेतल्या होत्या. वॉटफर्ड येथून १९४५-५५ दरम्यान ते निवडून आले होते. १६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पहिले भाषण केले, त्यावेळी जर्मनी शरण आलेला होता व जपानवर दोन अणुबाँब पडले होते. त्यावेळचे त्यांचे भाषण गाजले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2014 रोजी प्रकाशित
पत्रकार जॉन फ्रीमन यांचे निधन
ब्रिटनचे ख्यातनाम पत्रकार व भारतातील माजी उच्चायुक्त जॉन फ्रीमन (वय ९९) यांचे निधन झाले. त्यांची कारकीर्द चतुरस्र होती.

First published on: 22-12-2014 at 01:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist john freeman dies at