लंडन : विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्याच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची परवानगी ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्याला दिली.

इराक व अफगाणिस्तानातील युद्धांशी संबंधित हजारो गोपनीय कागदपत्रे फोडल्याच्या प्रकरणात ५० वर्षांचा असांज अमेरिकेला हवा आहे. तो आत्महत्या करण्याचा खरोखरच धोका असल्याने त्याला अमेरिकेला पाठवले जाऊ नये, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.

असांज याच्या मानसिक आरोग्याबाबतच्या चिंतेमुळे त्याचे प्रत्यार्पण केले जाऊ शकत नाही, या पूर्वीच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्धचे अपील अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात जिंकले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यामुळे असांजच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला धोका निर्माण होईल अशा कठोर र्निबधात्मक अटी त्याच्यावर लादल्या जाणार नाहीत, अशी हमी अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली होती. अमेरिकेने केलेले ‘प्रतिज्ञापूर्वक कथन’ असांज याला माणुसकीने वागवले जाईल याची हमी देण्यासाठी पुरेसे असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवला होता. आता या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असांजला मिळाला आहे.