गुरूचा नैसर्गिक उपग्रह असलेला युरोपा हा जीवसृष्टीस अनुकूल असल्याचा नासाच्या वैज्ञानिकांचा अंदाज आहे. अगदी मंगळापेक्षाही तेथील स्थिती पृथ्वीसारख्या जीवसृष्टीस अनुकूल असल्याचे त्यांचे मत आहे.
गुरूचा सहावा निकटचा चंद्र असलेला युरोपाचे जीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून संशोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांचे मत आहे. महासागर, बर्फाचा पातळसा थर व ऑक्सिडंट्स यामुळे युरोपा हा जीवसृष्टीस अनुकूल स्थिती असलेला उपग्रह आहे. नासाने म्हटले आहे की, पुढील मोहिमा स्वस्तात करण्यासाठी आम्ही युरोपा या गुरूच्या चंद्राचा शोध येत्या काही वर्षांत घेणार आहोत. ग्रह वैज्ञानिक रॉबर्ट पॅपलाडरे यांनी सांगितले की, वस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून युरोपावरील स्थिती अनुकूल आहे. युरोपाच्या संशोधनासाठी २ अब्ज डॉलरचा क्लिपर हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे, पण त्याला अजून मान्यता मिळणे बाकी आहे.
शनीच्या टायटन या चंद्राच्या संशोधनासाठीची कॅसिनी मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता नासा गुरूच्या कक्षेत यान पाठवणार असून युरोपाचे जवळून निरीक्षण करणार आहे. त्या पद्धतीनेही युरोपा या उपग्रहाची बरीच माहिती मिळणार आहे. क्लिपर हे यान २०२१ मध्ये पाठवले जाण्याची शक्यता असून ते त्यानंतर तीन ते सहा वर्षांनी युरोपावर पोहोचेल. नासाने गेल्या वर्षी असे जाहीर केले होते की, नवीन अंतराळ मोहिमांसाठी निधी उपलब्ध करता येणार नाही. त्यापेक्षा मंगळावर २०२० पर्यंत नवीन रोबोट (क्युरिऑसिटीसारखा ) पाठवला जाईल. १९७९ मध्ये गुरूच्या युरोपा नावाच्या चंद्राचे निरीक्षण व्हॉएजर यानाने केले होते. त्यानंतर गॅलिलिओ यानाने त्याचे निरीक्षण केले. वैज्ञानिकांच्या मते शनीचा एनसीलेड नावाचा चंद्रही अधिवासासाठी अनुकूल आहे.
महासागर, बर्फाचा पातळसा थर व ऑक्सिडंट्स यामुळे युरोपा हा जीवसृष्टीस अनुकूल स्थिती असलेला उपग्रह आहे. नासाने म्हटले आहे की, पुढील मोहिमा स्वस्तात करण्यासाठी आम्ही युरोपा या गुरूच्या चंद्राचा शोध येत्या काही वर्षांत घेणार आहोत.