लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. हल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्या कमलेश तिवारी यांना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. मात्र, ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भोपाळमधून भाजपाच्या खासदार असणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साध्वी यांनी ट्विटरच्या माध्यामातून म्हटले आहे की, ” कमलेशजी तिवारी यांची क्रुर हत्या देश, धर्म, हिंदुत्वासाठी मोठा आघात आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारतमातेच्या सुपूत्रास शत शत प्रणाम ”

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. ज्यानंतर लखनऊ भागातली दुकानंही बंद करण्यात आली होती. आता कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आल्यानंतरही लखनऊमध्ये तणाव आहे. बाजारपेठेतील सगळी दुकानं बंद करण्यात आली आहेत. कमलेश तिवारी यांच्यावर गोळी चालवणारे हल्लेखोर बाईकवरुन आले होते. याप्रकरणी पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप केला जातो आहे. कारण कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास १०० हा नंबर डायल करत होता, मात्र फोन लागला नाही. घटना घडल्यावर अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळाने पोलीस पोहचले असेही तिवारी यांच्या नोकराने सांगितले.कमलेश तिवारी यांच्या कार्यालयाजवळ तीन अज्ञात एका गाडीवर आले होते. कमलेश तिवारी यांना भेटवस्तू देण्याच्या निमित्ताने ते त्यांच्या कार्यालयात शिरले. तिथे त्यांनी कमलेश तिवारींवर गोळी झाडली आणि पळ काढला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamlesh tiwari assassinated is a major attack on country religion hindutva msr
First published on: 18-10-2019 at 20:03 IST