कंगना रणौतला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी!

मनाली पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली तक्रार ; जाणून घ्या अधिक माहिती

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आता एका नव्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरून कंगनाला तशी धमकी देण्यात आली आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि ट्विट्समुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या कंगनाला आता सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने, तिने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून, धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद नोंदवली आहे.

कंगनाने पोलिसांना सांगितले की, तिला सोशल मीडियावरून एक व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर कंगनाने मनाली पोलीस स्टेशन गाठून तिथे धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत कुल्लूचे पोलीस अधिक्षक गुरदेव शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, कंगना रणौतने मनाली पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारपत्र दिले आहे, ज्यामध्ये तिने लिहिले की, सोशल मीडियावर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी कलम २९५ ए, ५०४, ५०५,५०६,५०९ आयपीसी अंतर्गत प्रकरण प्रविष्ट केले आहे.

शीखांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ

दरम्यान, शीखांसदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून कंगना रणौतच्या अडचणीत वाढ झालीय. आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी कंगनाला समन्स पाठवलं आहे. त्यामुळे या प्रकरणात कंगनाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. कंगनावर शिख समुदायाविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut threatened to kill msr

Next Story
बिहार विधानसभेत सापडल्या दारुच्या बाटल्या; तेजस्वी यादव म्हणाले “मुख्यमंत्र्यांच्या चेंबरपासून काही अंतरावर ब्रॅण्ड..,”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी