गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर दोन व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातला एक व्हिडीओ आहे अभिनेत्री कंगना रनौत हिचा. तर दुसरा व्हिडीओ आहे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा. दोन्ही व्हिडीओंमध्ये हे दोघे तिरंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या व्हिडीओंवर समर्थन आणि विरोधातील प्रतिक्रियांचा वेगळाच सामना रंगू लागला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानंही फटकेबाजी केली असून कंगना रनौतच्या समर्थनार्थ एक्सवर (ट्विटर) त्यानं एक सविस्तर पोस्टच लिहिली आहे!

नेमकं काय घडतंय?

या ‘ऑनलाईन’ सामन्याला सुरुवात झाली ती वकील प्रशांत भूषण यांनी २५ ऑक्टोबर अर्थात बुधवारी एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे. या पोस्टमध्ये प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतचा एका कार्यक्रमातला एक व्हिडीओ शेअर करताना “खूब लडी मर्दानी, वो तो झांसे वाली रानी थी” अशी खोचक पोस्ट केली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कंगना रनौत एका कार्यक्रमात स्टेजवर काही मान्यवरांबरोबर उभी असून तिच्या हातात सजवलेला धनुष्यबाण दिसत आहे. कंगना बाण मारण्याचा वारंवार प्रयत्न करत असून त्यात तिला अपयश येत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले

भाजयुमोच्या अध्यक्षाची खोचक पोस्ट!

दरम्यान, बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास प्रशांत भूषण यांनी पोस्ट केल्यानंतर तीन तासांत म्हणजेच दुपारी १२ च्या सुमारास गुजरात भाजयुमोचे अध्यक्ष हार्दिक भावसार यांनी दुसरा एक व्हिडीओ शेअर करत खोचक पोस्ट केली. “दुनिया का एकमात्र तिरंदाज, जो तीर चलाने के बाद खुदही पकड ले! कोई जानता है इन्हे?” असा प्रश्न हार्दिक भावसार यांनी पोस्टमध्ये केला आहे. हा व्हिडीओ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या हातात धनुष्यबाण दिसत असून त्यांनी मारलेला बाण चुकून तिथल्या तिथे हवेत उडाल्यानंतर तो त्यांनी पुन्हा हातात झेलल्याचं दिसत आहे.

दानिश कनेरियाची पोस्ट

हे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यावर थेट पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं एक्सवर पोस्ट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रशांत भूषण यांनी केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दानिश कनेरियानं कंगना रनौतची बाजू घेतली आहे.

“विनोद करणं हे फार सोपं आहे. किमान कंगनानं चित्रपटांच्या माध्यमातून तिच्या देशासाठी काहीतीर चांगलं केलं आहे. पण तुम्ही खऱ्या आयुष्यातही काहीही चांगलं करत नाही आहात. मणिकर्णिका सगळ्यांनी पाहायलाच हवा असा चित्रपट आहे. या चित्रपटामुळे आपल्या सगळ्यांमध्येच स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना जागृत होते”, असं दानिशन कनेरियानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.