कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन ६ कामगार ठार ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील निरानी साखर कारखान्यात आज (रविवार) काही वेळापूर्वी ही घटना घडली. हा साखर कारखाना भाजपा नेते मुरुगेश निरानी यांचा आहे. कारखान्याचे नेहमीप्रमाणे काम सुरु असताना अचानक बॉयरलचा स्फोट झाला. त्यावेळी तिथे काही कामगार काम करत होते. बॉयलरचा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे बाजूची भिंतही कोसळली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. सदर घटनेची चौकशी सुरु असल्याचे, मुधोळ पोलिसांनी सांगितले.