scorecardresearch

Premium

एका गुणासाठी १० वीचा पेपर पाठवला रिचेकिंगला, आता १०० टक्के मिळवून झाला बोर्डात टॉपर

१०० पैकी १०० टक्के मिळवण्याचा त्याला पूर्ण विश्वास होता

( मोहम्मद कैफ मुल्ला )
( मोहम्मद कैफ मुल्ला )

परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना थोडे कमी गुण मिळाले की गुण वाढतील या अपेक्षेने ते पेपर रिचेकिंगला पाठवतात. पण, कर्नाटकमध्ये १० वीच्या एका विद्यार्थ्याने केवळ एक गुण कमी मिळाला म्हणून पेपर रिचेकिंगला पाठवला. विशेष म्हणजे रिचेकिंगमध्ये त्याला गमावलेला तो एक गुणही मिळाला आणि आता १०० टक्के गुण मिळवण्याची किमया त्याने केली आहे.

मोहम्मद कैफ मुल्ला याला दहावीत ६२५ पैकी ६२४ मार्क मिळाले होते आणि तो संयुक्तपणे एका विद्यार्थ्यासोबत टॉपर होता. पण, आपला एक गुण गेल्यामुळे तो नाराज होता. हा एक गुण कसा गेला, याचा शोध घेण्यासाठी त्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. त्याला विज्ञान या विषयात एक गुण कमी मिळाला होता. रिचेकिंगमध्ये अखेर त्याला गमावलेला एक मार्कही मिळाला आणि आता बौर्डातील एकमेव टॉपर म्हणून त्याला घोषित करण्यात आलं आहे.

delhi police
‘न्यूजक्लिककडून भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा कट’; दिल्ली पोलिसांचा ‘एफआयआर’मध्ये आरोप
disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Asian Games: India got seven medals on the ninth day of Asian Games NC Sojan won silver in long jump and 4x400 meter race
Asian Games: टीम इंडियाच्या बाबतीत घडला चमत्कार! ४x४०० रिलेमध्ये तिसरे येऊनही मिळाले कांस्यऐवजी रौप्य पदक, जाणून घ्या
militery nursing services
महिलांना सियाचीनमध्ये तैनात करतात, मग पुरुषांना नर्स म्हणून का नियुक्त करू नये? HC चा सवाल

माध्यमांमधील वृत्तानुसार, १०० पैकी १०० टक्के मिळवण्याचा त्याला पूर्ण विश्वास होता. प्रत्येक पेपर झाल्यानंतर तो आपण लिहिलेली उत्तरं बरोबर आहे की नाही याची खात्री शिक्षकांकडून किंवा पुस्तकातून करुन घ्यायचा. त्याची आई परवीन मुल्ला आणि वडील हारून रशीद मुल्ला दोघेही शिक्षक आहेत. आयएएस बनण्याचं त्याचं स्वप्न आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karnataka boy who scored 624625 marks in 10th boards becomes topper after re evaluation

First published on: 10-06-2018 at 14:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×