कर्नाटकातील काँग्रेस नेते सतीश जारकीहोली यांच्या एका वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. “हिंदू’ शब्दाचा अर्थ खूप घाणेरडा असून हा शब्द भारतातील नसून मूळ पर्शियन आहे” असे जारकीहोली यांनी म्हटले आहे. ‘हिंदू’ शब्दाचा भारताशी काहीही संबंध नाही, हा शब्द लोक कसा काय स्वीकारु शकतात, असा सवाल त्यांनी केला आहे. या शब्दाचा अर्थ जर कळला तर तुम्हाला लाज वाटेल, असंही जारकिहोली म्हणाले आहेत.

काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करा, कोर्टाचा आदेश

“हिंदू शब्दाचा उगम कुठून झाला? हा शब्द आपला आहे का? हा इराण, इराक, उझबेकिस्तान, कझाकिस्तानातील पर्शियन शब्द आहे. या शब्दाचा भारताशी काय संबंध? या शब्दाचा स्वीकार तुम्ही कसा करू शकता? यावर चर्चा व्हायला पाहिजे”, असं जारकीहोली यांनी म्हटलं आहे. कर्नाटकातील या मंत्र्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या सत्ताधारी भाजपाने समाचार घेतला आहे. जारकीहोली यांचं वक्तव्य चिथावणीखोर असून हिंदूंचा अपमान करणारं आहे, असं भाजपाने म्हटलं आहे.

‘हर हर महादेव’वरुन NCP vs MNS: आव्हाडांचा ‘अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते’ असा उल्लेख करत मनसेचा हल्लाबोल

“काँग्रेसने लोकांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे. यात संभ्रम निर्माण करू नका”, अशी टीका कर्नाटकातील उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथनारायणण सीएन यांनी केली आहे. “अनावश्यक वाद निर्माण करू नका, समाजहिताच्या दृष्टीने ते चांगले नाही”, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Bharat Jodo Yatra : शिवरायांच्या जयघोषाने राहुल गांधींनी केली भाषणाला सुरुवात; म्हणाले “या पदयात्रेस कोणतीही शक्ती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जारकीहोली यांचं वक्तव्य अत्यंत दुर्देवी असल्याचं सांगत काँग्रेसकडूनही निषेध नोंदवण्यात आला आहे. “हिंदू धर्म ही एक जीवनशैली असून सभ्यतेचे वास्तव आहे. काँग्रेसनं धर्म, संस्कृती आणि श्रद्धा जपण्यासाठी देशाची निर्मिती केली आहे. हेच भारताचे सार आहे”, असं ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे. जारकीहोली यांच्या वक्तव्याचा निःसंदिग्धपणे निषेध करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.