कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षांच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा येडियुरप्पांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. द हिंदूने या बाबतचं वृत्त दिलं आहे.

गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल

सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री म्हणजेच १४ मार्चच्या रात्री उशिरा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला. १७ वर्षांच्या मुलीच्या आईने लैंगिक अत्याचाराची तक्रार त्यांच्याविरोधात नोंदवली. त्यानंतर त्याच प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर येडियुरप्पांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करण्याचा कायदा म्हणजेच POCSO च्या अंतर्गत येडियुरप्पांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईनं गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.