आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचा पुत्र कार्ती चिदम्बरम याची ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये उटीमधील बंगल्यांसह इंग्लंड आणि स्पेनमधील मालमत्तेचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोडाईकनाल आणि उटी येथील कृषी जमीन आणि बंगले त्याचप्रमाणे दिल्लीच्या जोरबाग येथे असलेला कार्ती आणि त्याची आई नलिनी यांच्या नावावरील १६ कोटी रुपये किमतीचा फ्लॅट जप्त करण्याचे आदेश ईडीने दिले.

आयएनएक्स मीडिया हाऊसला अवैध रीतीने पैसा मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने तपास केला असताना अनेक अवैध व्यवहार उघड झाले. सीबीआयने कार्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्या आधारे ईडीची कारवाई सुरू आहे. जप्त करण्यात आलेली ५४ कोटी रुपयांची मालमत्ता कार्ती आणि एएससीपीएल कंपनीच्या नावावर आहे.

इंग्लंडमधील एक कॉटेज हाऊस (८.६७ कोटी रुपये) आणि बार्सिलोना (स्पेन) येथील १४.५७ कोटी रुपयांचा टेनिस क्लब ही मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईतील एका बँकेत असलेल्या ९० लाख रुपयांच्या मुदत ठेवी जप्त करण्यात आल्या असून त्या एएससीपीएल कंपनीच्या नावावर आहेत. सदर आदेश कायद्यावर आधारित नाही, त्यामुळे त्याविरुद्ध योग्य त्या कायदेशीर मंचावर दाद मागण्यात येणार असल्याचे कार्ती याने ट्वीट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karti chidambaram inx scam
First published on: 12-10-2018 at 01:18 IST