दिल्लीतील ४०० युनिटपर्यंत विजेचा वापर असलेल्या ग्राहकांसाठी वीजदरात ५० टक्के सबसिडी जाहीर करून आम आदमी पार्टीने (आप) आपल्या निवडणुकीतील दुसऱ्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली.
सबसिडीच्या घोषणेमुळे तिजोरीवर पुढील तीन महिन्यांसाठी ६१ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या सबसिडीचा दिल्लीतील २८ लाख ग्राहकांना लाभ होणार आहे.
वीजदरातील सबसिडीच्या घोषणेपाठोपाठ खासगी क्षेत्रातील तीन वितरण कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे ‘कॅग’मार्फत लेखा परीक्षण करण्याचे आदेशही लवकरच देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
दिल्लीकरांना केजरीवाल यांची नववर्ष भेट; वीजदरात ५० टक्क्यांनी कपात
सत्तेवर आल्यावर अवघ्या चार दिवसांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक आश्वासन पूर्ण केले आहे.

First published on: 31-12-2013 at 07:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal announces 50 power tariff cut for families consuming up to 400 units