केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टला गेल्या २५ वर्षांपासून उत्पन्न आणि खर्चाचे लेखापरीक्षण (ऑडिट) करावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले आहे. न्यायमूर्ती यूयू ललित, न्यायमूर्ती एस आर भट आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला.  लेखापरीक्षणात मंदिर आणि ट्रस्ट या दोन्हींचा आर्थिक खर्च समावेश असणे आवश्यक आहे असून हे ऑडिट तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाले पाहिजे, असंही खंडपीठाने म्हटलंय. पद्मनाभ स्वामी मंदिर हे त्रावणकोर राजघराण्याने बांधलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टने गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऑडिटमधून सूट मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. ट्रस्टने असा युक्तिवाद केला की, (न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार) केवळ ” ही ट्रस्ट केवळ पूजा आणि विधी यांसंबंधी गोष्टींसाठी उभारण्यात आली होती. ट्रस्टला मंदिर प्रशासनासंबंधीत कोणतेही करण्याचा अधिकार नाहीत. त्यामुळे त्याचं अस्तित्व मंदिरापासून वेगळं असल्याने त्याचा ऑडिटमध्ये समावेश करण्यात येऊ नये.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala padmanabha swamy temple trust will face audit says supreme court hrc
First published on: 22-09-2021 at 12:58 IST