Woman Suicide : धर्मांतरासाठी प्रियकाराने मारहाण आणि छळ सुरु केल्याने आणि तो असह्य झाल्याने २३ वर्षीय तरुणीने आयुष्य संपवलं. सोना एल्दहोस असं या तरुणीचं नाव आहे. ती टीचर ट्रेनिंग कोर्सची विद्यार्थिनी होती. तिने तिचा प्रियकर रमीसवर गंभीर आरोप केले आहेत. धर्म बदलण्यासाठी रमीस मारहाण करायचा आणि शारिरीक छळ करत होता असं तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. यानंतर आता पोलिसांनी सोनाचा प्रियकर रमीसला अटक केली आहे. केरळमधली ही घटना आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाने तिच्या सुसाईड नोटमध्ये हे लिहिलं आहे की रमीसने तिला लग्नाचं वचन दिलं होतं. मात्र लग्नाची नोंदणी करण्याआधी तुला धर्म बदलावा लागेल आणि इस्लाम स्वीकारावा लागेल असं सोनाला सांगण्यात आलं. सोनाने नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात येत होती आणि तिचा छळ करण्यात आला. हा छळ असह्य झाल्याने सोनाने आयुष्य संपवलं. सोनावर रमीसच्या कुटुंबानेही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला होता असं पोलिसांनी म्हटलं आहे. सोनाच्या सुसाईड नोटचा आधार घेत आम्ही रमीसच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. लग्नाचं खोटं वचन देऊन शरीरसंबंध ठेवल्याचाही गुन्हाही रमीसवर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. रमीसला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

या घटनेबाबत भाजपाने काय म्हटलं आहे?

विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर भाजपाने हा जिहादी दहशतवाद आहे असं म्हटलं आहे. तसंच जिहादी दहशतवाद केरळमध्ये वाढू लागला आहे असंही म्हटलं आहे. याबाबत सरकारने उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी भाजपाने केली आहे. तसंच ही घटना म्हणजे धार्मिक दहशतवाद आहे असंही म्हटलं आहे. दरम्यान भाजपाने या सगळ्या घटनेवर सरकार गप्प का बसलं आहे असाही सवाल केला.

जून महिन्यात अशीच एक घटना समोर आली होती

जून महिन्यात उत्तर प्रदेशातही अशीच घटना घडली होती. उत्तर प्रदेशातल्या एका गावात प्रयागराजहून एका तरुणीला केरळमध्ये आणलं होतं. त्यानंतर सक्तीने तिचं धर्मांतरण करण्यात आलं. यानंतर या मुलीच्या आईने तक्रार केली त्यानंतर पोलिसांन दरकशा बानो या धर्मांतरण करण्यात आलेल्या मुलीची सोडवणूक करण्यात आली.