पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी केव्हिन मॅकार्थी यांची निवड झाली. या पदासाठी शनिवारी झालेल्या मतदानाच्या ऐतिहासिक १५ व्या फेरीत त्यांना हे यश मिळाले. यामुळे या संदर्भातील देशातील दीर्घकाळ निर्माण झालेला राजकीय पेच संपला.५७ वर्षीय मॅकार्थीनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ८२ वर्षीय नॅन्सी पलोसी यांच्याकडून सूत्रे घेतली. ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर पलोसी यांनी सभागृहातील आपले बहुमत गमावले होते.

Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
Mallikarjun Kharge and narendra modi
मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका

या मध्यावधी निवडणुकीत ४३५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाने २२२ जागा जिंकल्या होत्या. तर डेमोक्रॅटिक पक्षाने २१२ जागा जिंकल्या होत्या.सभागृह अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाच्या पंधराव्या फेरीत मॅकार्थी यांना २१६ मते मिळाली, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ५२ वर्षीय हकीम सेकौ जेफरीज यांना २१२ मते मिळाली. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांपैकी सहा कथित बंडखोरांनी मॅकार्थी यांना मतदान केल्यानंतर बहुमताच्या जादूमय आकडय़ाला ते स्पर्श करू शकले.

मॅकार्थी हे अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह)चे ५५ वे अध्यक्ष असतील. मतदानाच्या १५ व्या फेरीअखेर मॅकार्थी यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. या पदासाठीची ही सर्वात दीर्घकाळ चाललेली निवडणूक आहे. अमेरिकेच्या इतिहासात १८५५ मध्ये सर्वात दीर्घकाळ म्हणजे दोन एक निवडणूक झाली. त्यात मतदानाच्या १३३ फेऱ्या झाल्या होत्या.

चिनी साम्यवाद लक्ष्य : मॅकार्थी यांनी अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या संबोधनात प्रतिनिधीगृहास सांगितले की ते सार्वजनिक कर्जाच्या मुद्दय़ाकडे लक्ष देतील आणि सभागृहात ‘चिनी साम्यवादी पक्षाच्या उदया’विषयी चर्चा करेल. या प्रश्नांवर सभागृहात एकमत असले पाहिजे. परस्परांवर विश्वास टाकण्याची ही एक संधी आहे.

तडजोडीतून पद : सिनेटचे नेते चुक शुमर यांनी म्हटले आहे की, मॅकार्थीचे स्वप्न अमेरिकी जनतेसाठी दु:स्वप्न ठरू शकते. मॅकार्थीनी रिपब्लिकन पक्षाच्या छोटय़ा घटकांसमोर गुडघे टेकले आहेत. या तडजोडीत केव्हिन मॅकार्थीनी त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी कोणत्याही सदस्याला मतदान करण्याची मुभा देण्यास मान्यता दिली असल्याचे बोलले जात आहे.

‘अमेरिकेच्या हितास प्राधान्याची वेळ’
अध्यक्ष जो बायडेन यांनी मॅकार्थी यांना यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी यावेळी सांगितले, की जबाबदारीने कामकाज करण्याची संधी मिळाली आहे. मॅकार्थीच्या निवडीनंतर त्यांनी एका निवेदनात म्हटले, की, अमेरिकेच्या हितास प्रथम प्राधान्य देण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्यासह प्रथम महिला नागरिक जिल बायडन मॅकार्थीचे अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो. अमेरिकन नागरिक आपल्या हितांचे रक्षण करण्यास प्राधान्य देतात. आपल्या नेत्यांकडूनही त्यांची हीच अपेक्षा असते. मी रिपब्लिकन पक्षासह काम करण्यास तयार आहे तसेच रिपब्लिनन पक्षानेही आपल्यासह काम करावे, अशी मतदारांची अपेक्षा आहे.