Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. तसंच, या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणीही जोर धरतेय. दरम्यान, या हत्येविरोधात पुकारलेल्या निषेध रॅलीत पीडितेच्या पालकांनीही सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर पांघरुण घालण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तसंच, आम्हाला सहजरित्या न्याय मिळणार नाही, त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय.

“जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असल्याने मुलीला न्याय मिळवण्यासाठी धैर्य मिळालं आहे. आम्हाला सहजासहजी न्याय मिळणार नाही. आम्हाला तो हिसकावून घ्यावा लागणार आहे. सर्वांच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही”, असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय.

man killed his girlfriend and hanged himself In Pimpri Chinchwad
लॉजवर प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न; पोलिसांनी रुमचा दरवाजा उघडल्यावर सापडला प्रियकराचा मृतदेह; पुण्यात नेमकं काय घडलं?
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
case has been registered against school boy in case of child molestation for unnatural act in school premises
शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार, अनैसर्गिक कृत्य प्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
British doctor who tried killing mother partner with fake COVID jab
बनावट कोव्हिड लस वापरून हत्येचा प्रयत्न; ब्रिटीश डॉक्टरने आईच्या साथीदाराला संपवण्याचा प्रयत्न का केला? नेमकं प्रकरण काय?
Badlapur case, school trustees Badlapur case,
बदलापूर प्रकरण : …तर शाळेच्या विश्वस्तांना अद्याप का शोधू शकला नाहीत ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना संतप्त प्रश्न
cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
akshay shinde s father in high court
बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण : पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त करून अक्षय शिंदेच्या वडिलांची उच्च न्यायालयात धाव
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!

हेही वाचा >> Kolkata Rape Case : “कोलकाता बलात्कार प्रकरण घडल्यानंतर रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे आदेश”, भाजपाच्या दाव्यामुळे खळबळ

“मी जेव्हा मुलीला झालेल्या त्रासाबद्दल, तिच्या वेदनांबद्दल विचार करते तेव्हा मी थरथर कापते. समाजाची सेवा करण्याचं तिचं स्वप्न होतं. आता ही आंदोलक मुलं माझी मुलं आहेत”, असं पीडितेच्या आईने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. “सुरुवातीपासूनच पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं नाही. त्यांनी सहकार्य केलं असतं तर आम्हाला आशेचा किरण दिसला असता. एवढा गुन्हा घडल्यानंतरही पोलिसांनी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. पुराव्यांमध्येही छेडछाड केली”, असंही तिची आई म्हणाली.

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात नेमकं काय घडलं?

कोलकाताच्या सरकारी आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्ट रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालातून तिच्या शरीरावर जवळपास २५ अंतर्गत आणि बाह्य जखमा असल्याचं समोर आलं होतं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने पोलिसांनी संजय रॉय या स्वयंसेवकाला अटक केली. परंतु, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना १४ तास उशीर लागला. यामध्ये रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं जातंय. मुलीने आत्महत्या केल्याचे सांगून रुग्णालयाने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला होता, असा पालकांचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर मुलीचा मृतदेह पाहण्यासाठीही पालकांना तीन तास वाट पाहावी लागली होती.

आंदोलकांचे गंभीर आरोप

कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. दरम्यान, या प्रकरणात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. घटना घडली त्या दिवशी रुग्णालयात असलेल्या एका डॉक्टरने आरोप केला आहे की, पोलिसांनी क्राईम सीनशी (घटना घडली ती जागा) छेडछाड केली आहे. पोलीस या प्रकरणी चुकीची माहिती सादर करत आहेत. तसेच शवविच्छेदन दुसऱ्या कुठल्या तरी रुग्णालयात करायला हवं होतं. जेणेकरून या प्रकरणाची पारदर्शकता वाढली असती. मात्र या सगळ्याच गोष्टी आर. जी. कर रुग्णालयात केल्या. मुळात येथील अधिकारी आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहेत.