कोलकत्यातील टिटागढ स्थानकाजवळ ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. आज पहाटे ३.५०च्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटात किमान २५ जण जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
blast2
कोलकातापासून टिटागढ हे ३० किमी अंतरावर आहे. ही ट्रेन सियालदाह येथून कृष्णानगर येथे जात असतानाच हा स्फोट झाला. दरम्यान, सियालदाह मुख्य खंडात रेल्वे सेवा सुरळीत सुरु झाली आहे. दोन गटांमधील पूर्ववैमनस्यातून हा स्फोट घडवण्यात आल्याचा संशय वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून, बचावकार्य सुरु झाले आहे.