मथुरा श्री कृष्ण जन्मभूमी वादातील मशीद समितीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१९ मार्च) फेटाळली. वादाशी संबंधित १५ खटले एकत्र करून त्यांची एकत्रित सुनावणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मस्जिद समितीने विरोध केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयातच ठेवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे बांधण्यात आलेल्या शाही इदगाह मशिदीबाबतचा वाद बराच जुना आहे, त्यावर उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे.

मथुरा जिल्हा न्यायालयाकडून सर्व प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याविरुद्ध मशिदीच्या बाजूची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मशीद समितीच्या त्या याचिकेवर एप्रिलमध्ये सुनावणी होणार आहे. आजचे प्रकरण १८ पैकी १५ प्रकरणे एकत्रित करण्याच्या विरोधात होते. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केलेला नाही. कोर्टात या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले आहे.

supreme court verdict evm vvpat
EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; न्यायमूर्ती म्हणाले…
Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
supreme-court_
मदरसा कायदा रद्द करण्यास अंतरिम स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीचा अर्थ लावला- सर्वोच्च न्यायालय
chief justice dy chandrachud
‘मी व्हिस्कीचा चाहता’, सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी असं म्हटल्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…

हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने शाही इदगाह मशिदीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.” उच्च न्यायालयाने कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मस्जिद वादाशी संबंधित १५ प्रकरणे एकत्रित सुनावणीसाठी एकत्रित केली आहेत. ते म्हणाले, आज शाही इदगाह मशीद समिती त्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आली होती.

विष्णू शंकर जैन म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की तुम्ही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकत्रीकरणाच्या आदेशाविरोधात आधीच फेरविचार याचिका दाखल केली आहे, त्यामुळे आधी फेरविचार याचिकेवर निर्णय घ्यावा आणि त्यानंतर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात येऊ शकता.”