दहा वर्षांपूर्वी कुंभकोणम येथे एका शाळेत आग लागून झालेल्या दुर्घटनेत ९४ मुले ठार झाल्याच्या प्रकरणी खटल्यात न्यायालयाने १० जणांना दोषी तर ११ जणांना निर्दोष ठरवले आहे. तर शाळेचे मालक पलनीसामी यांना जन्मठेप व ४७ लाख दंड तर दुसऱ्या एका आरोपात १० वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा देण्यात आली.
दोषी ठरवलेल्यांमध्ये पाच जणांना ३०४ कलमान्वये सदोष मनुष्यवध, कलम ३३७ दुसऱ्याचा जीव व सुरक्षा धोक्यात आणणे, कलम ३३८ व्यक्तिगत सुरक्षा व जीवन धोक्यात आणणे, कलम २८५ आगीबाबत निष्काळजीपणा व तामिळनाडू मान्यताप्राप्त खासगी शाळा (नियंत्रण) कायदा १९७३ अन्वये दोषी ठरवण्यात आले. त्यात शाळेचे मालक व संस्थापक पलानीसामी, पत्नी सरस्वती, मुख्याध्यापिका संथाललक्ष्मी, दुपारच्या जेवणाच्या संयोजिका विजयालक्ष्मी व खानसामा वसंती यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbakonam school fire tragedy 10 held guilty
First published on: 31-07-2014 at 04:45 IST