मिरपूड फवारल्याने एल राजगोपाल यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र स्वसंरक्षणासाठी हे कृत्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजगोपाल यांना लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांना निलंबित केले आहे. इतरांवरही अशीच कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तेलुगू देशमच्या एम वेणुगोपाल रेड्डी यांना काँग्रेसच्या काही सदस्यांनी लक्ष्य केले होते, त्यांना वाचवण्यासाठी आपण पुढे आलो असा युक्तिवाद राजगोपाल यांनी केला आहे. मात्र सदस्यांनी आपल्यावरच हल्ला केल्याने स्वसंरक्षणार्थ हे कृत्य केले, असे त्यांनी संसदेबाहेर स्पष्ट केले. आपल्याला तेलंगण समर्थक निदर्शकांकडून धोका असल्याने नेहमीच मिरपूड जवळ ठेवतो, असे समर्थनही त्यांनी केले. अनेक सदस्यांना दम्यासारखे विकार असताना, मिरपूड फवारणे कितपत योग्य आहे, असे विचार ही बचावात्मक कृती आहे. महिलांना जेव्हा असुक्षित वाटते तेव्हा त्या वापरतात. माझ्यावर हल्ला झाला होता, असे उत्तर दिले. त्यांच्यासह सीमांध्र भागातील पाच खासदार सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची मागणी करीत होते. काँग्रेस पक्ष लोकशाहीची भाषा करतो, मात्र कृती उलटी आहे असा टोलाही लगावला. आम्ही काँग्रेस नेत्यांनाच नमवू,असे सांगत पक्षालाच आव्हान दिले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
स्वसंरक्षणासाठी मिरपूड फवारली-राजगोपाल
मिरपूड फवारल्याने एल राजगोपाल यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र स्वसंरक्षणासाठी हे कृत्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजगोपाल यांना लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांना निलंबित केले आहे.
First published on: 14-02-2014 at 02:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: L rajgopal who used pepper spray in lok sabha once moved a bill to curb unruly behaviour