भारत आणि चीन यांच्यातील लष्करी स्तरावरील चर्चेच्या १२ व्या फेरीत दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधील गोगरा हाइट्समधून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, चर्चेच्या १२ व्या फेरीत दोन्ही बाजूंनी PP-17A मधून बाहेर पडण्याचा करार झाला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये दोन्ही पक्षांदरम्यान अंतिम निर्बंध करार झाला होता. मग पॅनगॉन्ग तलावाच्या काठावरून सैन्य हटवण्याचे मान्य झाले.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कोर कमांडर स्तरावर १२ व्या फेरीच्या चर्चेत दोन्ही बाजूंनी PP-17A मधून माघार घेण्याचा करार झाला आहे. PP-17A गोगरा म्हणून ओळखला जातो. दरम्यान, या निर्णयामुळे पूर्व लडाखमधील दोन्ही देशांमधील संघर्ष संपण्याची शक्यता नाही कारण इतर काही ठिकाणी तणाव आहे.
हेही वाचा- तिबेटमध्ये चीनने लष्करभरतीसाठी लागू केला नवा नियम; भारताविरूद्ध तैनात करण्याची तयारी
तसेच PP- 15 व (हॉट स्प्रिंग्स) आणि डेपसांग यासह काही स्टँडऑफ पॉइंटवर समस्या सोडवण्यासाठी दोन्ही देश आपली चर्चा सुरू ठेवतील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही बाजूंनी ३१ जुलै रोजी चुशुल-मोल्दो येथे चर्चा झाली, त्यानंतर २ ऑगस्ट रोजी त्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. सध्या, दोन्ही देशांतील सुमारे ५०,००० ते ६०,००० सैनिक एलएसीच्या बाजूने संवेदनशील क्षेत्रात तैनात आहेत.
हेही वाचा- भारतीय भूभागावर चीनचे तंबू
शनिवारी झालेल्या भारतीय आणि चिनी सैन्याच्या सर्वोच्च कमांडर्स यांच्यात नऊ तास चाललेल्या बैठकीत विशेषत: पूर्व लडाखमधील स्टँडऑफच्या उर्वरित बिंदूंमधून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. बैठकीदरम्यान भारताने हॉट स्प्रिंग, गोगरा आणि डेपसांगमधील प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला होता. यापूर्वी लष्करी चर्चेची ११ वी फेरी ९ एप्रिल रोजी एलएसीच्या भारतीय बाजूच्या चुशूल सीमा बिंदूवर आयोजित करण्यात आली होती आणि ही चर्चा सुमारे १३ तास चालली होती.