गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रकृती आता आधीच्या तुलनेत उत्तम असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. त्या लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे ठणठणीत होऊन घरी कधी परततील याची आम्ही वाट पाहत आहोत, असंही त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करत त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय, असं ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतो, अशा आशयाचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्या औषधोपचांराना योग्य प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी  दिली. सध्या आम्ही त्यांची प्रकृती उत्तम होण्याची वाट पाहत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar stable now mns chief raj thackeray tweets for her jud
First published on: 14-11-2019 at 13:56 IST