आता संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा न देताही आयएएस अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारने नागरी सेवा परीक्षांमध्ये थेट भरतीसोबतच लॅटरल प्रवेश देण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पंतप्रधान कार्यालयाने कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासगी क्षेत्रात मोठ्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विविध सरकारी विभागांमध्ये सचिव, संचालक किंवा संयुक्त सचिव पदावर नियुक्त करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. अशा व्यक्तींना किती पगार द्यायचा यावर अद्याप निर्णय झालेला नाही. केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती पगाराविषयी आणि निवड प्रक्रियेविषयी अंतिम निर्णय घेणार आहे.  पहिल्या टप्प्यात ४० जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. देशातील २४ राज्यांमध्ये सध्या २० टक्के आयएएस अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. खासगी कंपन्यांमधील अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संधी देऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. योग्यता आणि अनुभवाच्या आधारे ही निवड केली जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lateral entry in civil services pmo ordered department of personnel to submit suggestions upsc ias
First published on: 17-07-2017 at 12:26 IST