पश्चिम बंगाल मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत आपण अद्याप विचार केलेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोककुमार गांगुली सांगितले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आयोगाचा राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर सर्व थरातून दबाव वाढत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात हा मुद्दा गुरुवारी उपस्थित करण्यात येणार असून, याबाबत आपली भूमिका काय असणार याबाबत विचारले असता, आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.