कायदामंत्र्यांच्या तोंडी गुन्हेगारांची भाषा, काँग्रेसची टीका

काही माजी न्यायाधीश भारतविरोधी टोळीमध्ये सहभागी आहेत, असे विधान केल्यामुळे विधिमंत्री किरेन रिजिजू यांच्यावर टीका होत आहे.

jayram ramesh kiran rijiju
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली : काही माजी न्यायाधीश भारतविरोधी टोळीमध्ये सहभागी आहेत, असे विधान केल्यामुळे विधिमंत्री किरेन रिजिजू यांच्यावर टीका होत आहे. कायदामंत्री गुन्हेगारांच्या भाषेत बोलत आहेत अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली तर एखादा मंत्री असे विधान करून नामानिराळा राहू शकत नाही, या विधानाची पुष्टी करणारे पुरावे द्या, धमकी देऊ नका अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सिरकर यांनी केली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदा व न्यायमंत्री कपिल सिब्बल यांनीही रिजिजू यांच्यावर टीका केली. काही लोकांना आपण काय बोलत आहोत तेच समजत नाही असे ते म्हणाले. तर किरेन रिजिजू हे कायद्याचे मंत्री आहेत की अनागोंदीचे असा प्रश्न माकप नेते थॉमस आयझ्ॉक यांना विचारला.  मुन्सिफ होण्याची पात्रता नाही अशी व्यक्ती न्यायाधीशांना धमकावत आहे, अशी टीका ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केली.

विधिमंत्रीच अन्यायाचा प्रसार करत आहेत. जर ही अभिव्यक्तीनंतरच्या स्वातंत्र्याला धमकी नसेल तर काय आहे?

– जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 00:02 IST
Next Story
अमृतपालसिंग अद्याप फरार
Exit mobile version