शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या प्रकरणाची सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्यामुळे महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून योग्य ती पावलं उचलण्यात न आल्यामुळे आज न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून सुनावलं आहे. आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं प्रकरण एकत्रित रित्या ऐकणार असल्याचंही म्हटलं आहे. याबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे आव्हाड यांनी?

आज सर्वोच्च न्यायालयाने जी वाक्यं वापरत अध्यक्षांना सुनावलं त्यातून सर्वोच्च न्यायालयाला काय अधोरेखित करायचं आहे ते सगळ्यांनाच समजलं असेल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. कोर्टाचं हे म्हणणं की तुम्ही कोर्टाला गांभीर्याने घेत नाही हे बरंच काही सांगून जाणारं आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. जस्टिस नरीमन यांच्या प्रकरणाचं उदाहरण कोर्टाने दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचं वेळापत्रक अध्यक्षांना द्यावंच लागेल कारण हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कोर्टाने म्हटलं आहे की सेना आणि राष्ट्रवादीचं एकत्रित ऐकू. आज एकत्र ऐकल्यावर पुढच्या वेळीही एकत्रच ऐकणार कारण ते सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे कोर्टाच्या आदेशातच तो उल्लेख आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जो आदेश कोर्टाने दिला तोच मी सांगतो आहे असंही आव्हाड म्हणाले. अध्यक्षांवर कोर्टाने काय म्हटलं आहे ते सगळ्यांना माहित आहे. कोर्टाचा निर्णय स्पष्ट आहे