scorecardresearch

Premium

लिओनेल मेसीचा इंटर मियामी क्लबशी करार

मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेटिना संघाने गेल्या वर्षी कतार येथे झालेल्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते.

lionel messi s sign contract with inter miami club for major league soccer
(संग्रहित छायाचित्र) लिओनेल मेसीने

मियामी :अर्जेटिनाचा तारांकित आघाडीपटू आणि फुटबॉलमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीने अमेरिकेतील इंटर मियामी क्लबशी दोन वर्षांचा करार केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा इंटर मियामीने शनिवारी केली.

प्रतिष्ठेचा बॅलन डी’ओर पुरस्कार सात वेळा जिंकणाऱ्या मेसीचा फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेनसोबतचा करार २०२२-२३ हंगामाच्या अखेरीस संपुष्टात आला. त्यानंतर त्याने अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘माझ्या कारकीर्दीतील पुढील टप्पा इंटर मियामी संघासोबत आणि अमेरिकेत सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे,’’ असे मेसी म्हणाला.

WPL 2024 Delhi Capitals vs Mumbai Indians Live Streaming Updates
WPL 2024 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई-दिल्ली आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
rohit sharma named as a indian team captain for t20 world cup 2024
‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रोहितच कर्णधार’
Shubman Gill's century against England
IND vs ENG : “शुबमन गिलची ही खेळी…”, टीम इंडियाच्या ‘प्रिन्स’चे शतकानंतर सचिन तेंडुलकरने केले कौतुक
U19 World Cup 2024 fastest fifty record
U19 World Cup 2024 : ६,६,६,६,४,६…दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम मोडत रचला इतिहास

मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेटिना संघाने गेल्या वर्षी कतार येथे झालेल्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. मेसीला करारबद्ध करणे हे आमचे स्वप्न होते आणि आता ते सत्यात उतरले आहे, अशी भावना इंटर मियामीचा सह-संघमालक आणि माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने व्यक्त केली.

लीग्स करंडक फुटबॉल स्पर्धेतील २१ जुलैला होणाऱ्या क्रूझ अझुलविरुद्धच्या सामन्यात मेसी इंटर मियामीकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे. इंटर मियामीला विजयपथावर आणण्याची जबाबदारी मेसीवर असेल. मियामीने गेल्या ११ पैकी एकाही सामन्यात विजय नोंदवलेला नाही. शनिवारी मेजर लीग सॉकरमध्ये मियामीला सेंट लुईस सिटी संघाकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lionel messi s sign contract with inter miami club for major league soccer zws

First published on: 17-07-2023 at 04:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×