उत्तराखंडच्या विकासासाठी येथील नागरिकांनी काँग्रेसला हटवणे गरजेचे आहे. विकासाची गंगा जर येथे आणावयाची असेल तर भाजपशिवाय पर्याय नसल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उत्तराखंड येथील श्रीनगर येथे विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने पुरावे मागण्याआधीच आमच्या लोकांनी त्याचे पुरावे मागितले. आमच्या राजकारण्यांना आमच्या सैनिकांच्या शौर्याचा पुरावा पाहिजे होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता वेळ बदलली आहे, दिल्लीमध्ये सरकार बदलले आहे. माझ्या देशातील सैनिक आता वार सहन करणार नाही. तो प्रतिवार करेल, असे त्यांनी विरोधकांना ठणकावले. मी गरीबांसाठी लढणार असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले. काँग्रेसने उत्तराखंडच्या निर्मितीस विरोध केला होता. मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही या राज्य निर्मितीला विरोध केला होता, असे सांगत या सरकारने उत्तराखंडच्या या देवभूमीला लूटभूमी बनवले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. या राज्याचा पर्यटन विकास करण्याची चांगली संधी असताना या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील युवकांना हे राज्य सोडून कामाधंद्यासाठी दुसरीकडे जावे लागले, अशी खंत व्यक्त केली. तसेच ७० वर्षे देशाला लुटणाऱ्यांशी लढण्यास हा चहावाला समर्थ असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले.

येत्या १२ मार्चला रावत सरकार हे भूतपूर्व सरकार बनेल व ११ मार्चला येणारे सरकारे हे अभूतपूर्व असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार येत्या काळात उत्तराखंडमध्ये रेल्वेचे जाळे वाढवणार असून राज्याच्या पर्यटन व्यवसायावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तराखंडच्या पाण्यात आणि जवानीत मोठा दम असल्याचे ते म्हणाले. देशातील सव्वाशे कोटी जनतेचा मला आशिर्वाद असल्यामुळे मी शक्तीशाली लोकांशी लढण्यास समर्थ आहे. केंद्र सरकारने चारधाम महामार्गासाठी १२ हजार कोटी रूपय दिल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

केंद्र सरकारने चारधाम महामार्गासाठी १२ हजार कोटी रूपये दिल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. उत्तराखंड ही त्याग आणि सामर्थ्याची भूमी आहे. या राज्यात पर्यटन व्यवसायाची मोठी संधी आहे. याकडे भाजपचे लक्ष असेल. इथले पर्यटन वाढले तर इथला युवक राज्यातून पलायन करणार नाही. त्याला इथेच रोजगार मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.

Live Updates
13:07 (IST) 12 Feb 2017
सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने पुरावे मागण्याआधीच आमच्या लोकांनी त्याचे पुरावे मागितले- पंतप्रधान मोदी
12:43 (IST) 12 Feb 2017
वाजपेयी यांनी देशाला तीन नवीन राज्ये दिली- पंतप्रधान मोदी
12:39 (IST) 12 Feb 2017
उत्तरांखडच्या विकासासाठी काँग्रेसला राज्यातून हटवणे गरजेचे- पंतप्रधान मोदी