VIDEO: अन् लाईव्ह शोदरम्यान भाजपा नेत्याला फेकून मारली चप्पल

अँकरलाही घ्यावा लागला ब्रेक

न्यूज चॅनेल्सवर होणाऱ्या चर्चा तर आपण नेहमीच पाहत असतो. अनेकदा राजकीय विषयांसंबंधी असणाऱ्या या चर्चांमध्ये सहभागी झालेले पाहुणे एकमेकांसोबत वाद घालताना दिसतात. हे वाद अगदी टोकापर्यंतही जातात. पण आंध्रप्रदेशातील एका तेलुगू चॅनेलवर हा वाद इतका वाढला की चर्चेत सहभागी एका व्यक्तीने भाजपा नेत्याला चक्क चप्पल फेकून मारली.

भाजपा प्रदेश सरचिटणीस एस विष्णू वर्धन रेड्डी या चर्चेत सहभागी होती. लाईव्ह चर्चा सुरु असतानाच अमरावती संवर्धन समितीचे सदस्य के श्रीनिवास राव यांनी रेड्डी यांना चप्पल फेकून मारली.

पण नेमकं असं झालं काय?
भाजपाच्या विष्णू वर्धन रेड्डी यांनी के श्रीनिवास राव यांचे टीडीपीसोबत संबंध असल्याचा आरोप केला. यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली. मात्र जेव्हा रेड्डी वारंवार श्रीनिवार राव यांचे टीडीपीसोबत संबंध असल्याचा पुनरुच्चार करु लागले तेव्हा मात्र त्यांचा संताप झाला आणि त्यांनी चप्पल फेकून मारली.

आणखी वाचा- “माझ्या मांडीवर खेळला आहेस,” नितीश कुमार यांनी भाषणात व्यत्यय आणणाऱ्या तेजस्वी यादव यांना सुनावलं

घडलेल्या प्रकारामुळे चर्चेत सहभागी इतरांना आश्चर्याचा धक्काच बसला. तर दुसरीकडे सुरु झालेल्या या प्रकारामुळे अँकरलाही अचानक ब्रेक घ्यावा लागला. भाजपाने या घटनेचा निषेध केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Live tv debate turns ugly panellist throws shoe at andhra pradesh bjp leader sgy

ताज्या बातम्या