ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस यांनी आणणेली नवी कर प्रणाली वादात सापडली होती. त्यामुळे त्यांच्याच पक्षातून लिझ ट्रस यांना विरोध होत होता. ४५ दिवसांपूर्वीच लिझ ट्रस पंतप्रधानपदी विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर आता बोरिस जॉन्सन पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – अग्रलेख : आज की उद्या?

अविश्वासाचा आरोप करत बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळातील ४० पेक्षा जास्त आमदारांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली होती. त्यानुसार, अखेर ७ जुलै रोजी बोरिस जॉन्सन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.

हेही वाचा – अन्यथा : या मुलाखती इथे कशा?

जॉन्सन यांच्यानंतर ऋषी सुनक हे पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. मात्र, लिझ ट्रस यांनी पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव केला होता. ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या. ट्रस यांनी ब्रिटिश जनतेला करांमध्ये मोठी कपात करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा – अग्रलेख : ट्रस ‘ट्रसल्या’!

त्यानुसार, सत्तेत येताच नवी कर प्रणाली आणत करात मोठी कपात केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेला सामोरं जावं लागलं होतं. स्वपक्षातील खासदार आणि विरोधकांनीही या कर प्रणालीचा विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी ही कर कपात मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती. त्यात आता लिझ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा – अग्रलेख : ‘ट्रसट्रसती’ जखम!

लिझ यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा बोरिस जॉन्सन यांचे नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आले आहेत. “बोरिस जॉन्सन पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक आहे. परंतु, तो राष्ट्रहिताचा विषय असल्याचं जॉन्सन यांना वाटतं,” असे टाईम्सचे राजकीय संपादक स्टीव्हन स्विनफोर्ड यांनी म्हटलं.