मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या प्रचारासाठी पैसे वाटणाऱ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना पकडले आहे. पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रविवारी ही कारवाई केली आहे. सुकापूर इथं मतदारांना प्रत्येकी २०० रुपये वाटत असताना पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलं आहे.
शेकपाच्या कार्यकर्त्यांकडून भरारी पथकानं २०० रूपयांची २९ पाकिटं जप्त केली आहेत. पैसे वाटण्याबाबत भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी शेकाप कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. या सर्व प्रकारावर आता मोठी टीका होत आहे.
(आणखी वाचा : नवी मुंबईत मतदारांना पैसे वाटणाऱ्या दोघांना अटक )
दरम्यान, शनिवारीदेखील भरारी पथकाने कामोठे इथं पैसे वाटप करणाऱ्या दोन शेकाप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. तसंच सहायक निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.