पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यानं ‘इंडिया’ आघाडीला एकच धक्का बसला आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडलीय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. याबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं भगवंत मान यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसबरोबर युती करणार नाही. राज्यातील १३ जागांवर आम्हाला यश मिळेल.”

Prajwal Revanna and his father HD Revanna
Sex Scandal: प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याच्या वडिलांना समन्स, एसआयटी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Supreme Court
“सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
amit shah interview (1)
“काळ्या पैशांशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही”, अमित शाह यांचं निवडणूक रोख्यांबाबत मोठं भाष्य!
Delhi Bomb Threat
दिल्लीतील १०० शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी; केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू

हेही वाचा : भाजपचं नॅरेटिव्ह की नितीश कुमारांचा अजेंडा? इंडिया आघाडीला ठरवावं लागेल! 

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

“माझी काँग्रेस पक्षाशी कुठल्याही प्रकारे चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लोकसभा निवडणूक लढू, असं मी नेहमीच सांगितलं होतं. देशात काय होईल, याची काळजी मी करत नाही. पण, आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. बंगालमध्ये आम्ही एकटे लढू आणि भाजपाचा पराभव करू,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलं.

“‘भारत जोडो न्याय यात्रे’ची कल्पना देण्यात आली नाही”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पश्चिम बंगालमधून जाणार आहे. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी ‘इंडिया’ आघाडीची एक सदस्य आहे. राहुल गांधींनी न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण, याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही.”

हेही वाचा : अन्वयार्थ : सब माया है..

“ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणुका लढवल्या जाणार नाहीत”

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने तृणमूल काँग्रेससकडे १० ते १२ जागांची मागणी केली होती. पण, तृणमूलने काँग्रेसला फक्त २ जागा दिल्या होता. यानंतर पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती. “ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. ममता बॅनर्जी ज्या दोन जागा सोडण्यास तयार आहे, तिथे काँग्रेसने भाजपा आणि तृणमूलचा पराभव केला आहे. निवडणूक कशी लढवायची, हे काँग्रेसला माहिती आहे,” असा हल्लाबोल अधीर रंजन चौधरींनी ममता बॅनर्जींवर केला होता.