लंडन पोलिसांवर विद्यार्थ्यांची कपडे काढून झडती घेतल्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन आकडेवारीनुसार, लंडन पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचे कपड काढून झडती घेतल्याचे समोर आले आहे. यापैकी बुहतेक विद्यार्थी कृष्णवर्णीय आहेत. लंडन पोलिसांची हे कृत्य धक्कादायक असल्याचे मत लंडनचे आयुक्त रॅचेल डी सूझा यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- …अन् दुबईच्या राजकुमाराने Viral Video मधील त्या डिलेव्हरी बॉयला फोन करुन म्हटलं ‘Thank You’; जाणून घ्या काय घडलं

लंडन पोलिसांवर टीका

२०२० साली लंडनच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी एका १५ वर्षाच्या कृष्णवर्णीय विद्यार्थीनीचे कपडे काढून तिची झडती घेतली होती. या तरुणीकडे गांजा असल्याची शंका पोलिसांना होती. यावेळी तरुणीसोबत कोणतीही वडीलधारी व्यक्ती उपस्थित नव्हती. तसेच या तरुणीला मासिक पाळी आली असतानाही तिच्यासोबत पोलिसांच्या अशा प्रकरची वागणूकीनंतर पोलिसांवर टीका होत आहे. एवढचं नाही तर २३ टक्के विद्यार्थ्यांसोबत त्याचे पालक नसताना त्यांची कपडे काढून झडती घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानमधील बहिणीने भावासाठी यंदाही पाठवली राखी; म्हणाल्या, “२०२४ मध्ये…”

कृष्णवर्णीय मुलांच्या तपासणीचे प्रमाण अधिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिसोझा यांच्या म्हणण्यानुसार, २०१८ ते २०२० या कालावधीत १०-१७ वर्षे वयोगटातील एकूण ६५० मुलांचे कपडे काढून त्यांची झडती घेण्यात आली होती. त्यापैकी ५८ टक्के मुली कृष्णवर्णीय असल्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.