तवांग (अरुणाचल प्रदेश) : येथे भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत लष्कराच्या हवाई विभागातील लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव शहीद झाले. मेजर दर्जाचा त्यांचा सहकारी वैमानिक जखमी झाला आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी १०च्या सुमारास सीमा भागात नियमित उड्डाणादरम्यान हा अपघात झाल्याचे तेजपूर येथील संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुर्घटनेनंतर दोन्ही वैमानिकांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र लेफ्टनंट कर्नल यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी दोन तारांकित अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या अपघातामुळे कालबाह्य होत असलेल्या चित्ता आणि चेतक या हेलिकॉप्टरच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०१५ साली भारताने रशियासोबत कामोव्ह २२६ हेलिकॉप्टरच्या संयुक्त उत्पादनासाठी करार केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lt colonel killed in cheetah helicopter crash zws
First published on: 06-10-2022 at 04:35 IST