scorecardresearch

योगींच्या शपथविधीच्या काही तास आधीच लखनऊत मोठी चकमक; पोलिसांनी कुख्यात गुंडाला केलं ठार

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीच्या काही तास आधी राजधानी लखनऊत पोलिसांनी चकमकीत एका गुंडाला ठार केलं आहे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीच्या काही तास आधी राजधानी लखनऊत पोलिसांनी चकमकीत एका गुंडाला ठार केलं आहे. हसनगंज परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी राहुल सिंह नावाच्या गुंडाला ठार केलं. राहुल सिंहवर अलिगंजमधील ज्वेलर्सला लुटल्याचा आऱोप होता. या चोरीदरम्यान त्याने एकाची हत्या केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सिंहवर एक लाखाचं बक्षिस होतं. शुक्रवारी पहाटे ४ वाजता लखनऊ पोलिसांनी हसनगंज परिसरात राहुल सिंहला घेरलं. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात राहुल सिंह जखमी झाला होता. त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गतवर्षी अलीगंजमधील सोन्याच्या दुकानात झालेल्या चोरीत राहुल सिंह मुख्य आरोपी होता. राहुल सिंहकडे लुटलेले सोन्याचे दागिने सापडले असून पोलिसांनी जप्त केले आहेत. यासोबत पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं सापडली आहेत. राहुल सिंहचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार आलं असून गुंडांवर कारवाई केली जात आहे. याआधी पोलिसांनी आणखी एका गुंडाला ठार केलं होतं. वाराणसीत दोन लाखांचं बक्षीस असलेल्या मनिष सिंग उर्फ सोनू सिंहला पोलिसांनी ठार केलं. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lucknow police encounter rahul singh jewellery shop loot cm yogi adityanath oath ceremony sgy

ताज्या बातम्या