मध्य प्रदेशचे माजी मुख्यंमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भारती वर्मा या दत्तक मुलीचे आज (गुरूवार) निधन झाले. मागिल वर्षीच १ मे रोजी तिचा विवाह झाला होता. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच शिवराज सिंह पत्नी साधना आणि मुलगा कार्तिकेयसह विदिशा येथे पोहचले.

भारती वर्मा  नगर पालिकेत कार्यरत होत्या. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गुरूवारी दिवसाच त्यांची तब्येत बिघडली होती. यानंतर कुटूंबीयांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र योग्यवेळी उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांच्या कुटूंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

भारती यांची तब्येत क्षणाक्षणाला खालवत असताना वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने योग्य ते उपचार त्यांना मिळत नव्हते. अखेरीस डॉक्टर आल्यानंतर गडबडीत उपचार सुरू झाले मात्र थोड्यावेळातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.