गेल्या पंचावन्न दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा आज(रविवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुंभमेळ्यात पन्नास लाख भाविक नदीवर स्नान घेण्यासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दर बारा वर्षांनी अलाहबाद येथे महाकुंभमेळा होतो. यात देशाच्या कानाकोप-यातून भाविक सहभाग घेतात व यामेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमाजवळ अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. दरवर्षी महाकुंभमेळ्याते स्वरूपात वाढ होताना दिसते त्यामुळे कुंभमेळ्यातील भाविकांचा आकडा यावेळेस पन्नास लाखांहून अधिक असण्याची शक्यत आहे.