नवी दिल्ली : भारतात २०२० मध्ये रोज सरासरी ४१८ म्हणजे १ लाख ५३ हजार ५२ जणांनी आत्महत्या केल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीत सामोरे आले आहे. २०१९ मध्ये १ लाख ३९ हजार १२३ आत्महत्या झाल्या होत्या, असे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीत म्हटले आहे.

यातील १०६७७ आत्महत्या या कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत.  २०१९ मध्ये लाखात आत्महत्येचा दर हा १०.४ होता, तो आता गेल्या वर्षी ११.३ टक्के झाला आहे. महाराष्ट्रात २०२० मध्ये १९,९०९ आत्महत्या झाल्या असून तमिळनाडूत  १६,८८३, मध्य प्रदेशात १४,५७८, पश्चिम बंगालमध्ये १२,१०३, तर कर्नाटकात १२,२५९ आत्महत्या झाल्या आहेत. हे प्रमाण एकूण आत्महत्यांच्या तुलनेत अनुक्रमे १३ टक्के, ११ टक्के, ९.५ टक्के, ८.६ टक्के व ८ टक्के याप्रमाणे आहे. या पाचही राज्यांत एकूण ५०.१ टक्के आत्महत्या झाल्या असून उर्वरित २३ राज्यांमध्ये ४९.९ टक्के आत्महत्या झाल्या आहेत.

उत्तर प्रदेशाची  लोकसंख्या देशातील लोकसंख्येच्या  १६.९ टक्के आहे. एकूण आत्महत्यांचे  प्रमाण तुलनेत खूप कमी म्हणजे ३.१ टक्के आहे. दिल्लीत लोकसंख्या जास्त असून ३,१४२ आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर पुडुचेरीत ४०८ आत्महत्या झाल्या आहेत. एकूण ५३ मोठय़ा शहरांत २३,८५५ आत्महत्या झाल्या आहेत.

तेथील आत्महत्यांचा दर हा १४.८ टक्के आहे. अखिल भारतीय दर ११.३ टक्के असून त्या तुलनेत तो जास्त आहे.

पुरुषांचे प्रमाण ७०.९ टक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवाहाशी संबंधित कारणातून ५ टक्के, आजारातून १८ टक्के अशा ५६.७ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. पुरुष व महिला यांचे आत्महत्येचे प्रमाण अनुक्रमे ७०.९ व २९.१ टक्के इतके आहे. दरवर्षी ७० हजारांहून अधिक लोक आत्महत्या करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आत्महत्या टाळता येतात, फक्त त्यासाठी सामाजिक व व्यक्तिगत पातळीवर प्रयत्नांची गरज असते.