Maharashtra Politics Live News Updates, 29 July 2025 : महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे लाडकी बहीण योजना. आई-वडिलांच्या नंतर सर्वात मोठं नातं म्हणजे बहीण आणि भावाचं नातं. या निर्मळ नात्याचा अपमान महाराष्ट्र सरकारने केला आहे. असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. १४ हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती छाननीमध्ये समोर आली आहे. त्यानंतर आता या योजनेवरुन सरकारवर आरोप केले जात आहेत. दरम्यान ऑपरेशन सिंदूरवरुन लोकसभेत चर्चा सुरु आहे. आज खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरवरुन महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात पावसाने काही भागांमध्ये ब्रेक घेतला आहे. तर काही भागांमध्ये सरींवर सरी सुरु आहेत. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपली नजर असणार आहे.
Pune Mumbai Nagpur Latest News Live Updates in Marathi : लाडकी बहीण योजना हा सर्वात मोठा घोटाळा, सुप्रिया सुळेंचा आरोप; यासह महत्त्वाच्या घडामोडी
मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसला अपघात; ७ जखमी
“मला *** काढता का? तुमचा सगळा माज जिरवतो”, अजित पवारांच्या आमदाराचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; म्हणाले, “तुमचे सगळे धंदे…”
NCP MLA Nitin Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार नितीन पवार यांची शासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी मतदारसंघातील आश्रम शाळेतील प्रश्न व मूलभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित करत आंदोलन केलं. तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाला दाद न दिल्याने संताप व्यक्त केला. “तुम्हाला माज आलाय का? मी तुमची चांगलीच जिरवतो”, अशा शब्दांत पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
सावंतवाडी : मळगावात पंचमुखी नागोबाचे पूजन: दीड दिवसांचा अनोखा उत्सव!
"माझ्या जावयावर काही दिवसांपासून पाळत…", एकनाथ खडसेंचा दावा; म्हणाले, "पोलिसांनी फोनमधील खासगी फोटो घेऊन…"
"सात जणांच्या पार्टीला रेव्ह म्हणतात का?" प्रांजल खेवलकरांवरील कारवाईवर एकनाथ खडसेंचा संशय; पोलिसांना विचारले आठ प्रश्न
तरच मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ… महाविद्यालये, विद्यापीठांना उच्च शिक्षण संचालकांचे निर्देश काय?
भोजापूर धरण भरून वाहू लागले; पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘सेमी इंग्लिश’ करण्यावर भर; जयकुमार गोरे यांची माहिती
कलापिनी कोमकली यांचे गायन, प्रवीण गोडखिंडी यांच्या बासरीवादनाने रसिक संमोहित
गोवा विधानसभेत त्रिभाषा सूत्रामुळे मराठी भाषेच्या स्थानाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार जीत आरोलकरांच्या भूमिकेला सिंधुदुर्गमधून पाठिंबा हवा
नवी मुंबईतीनवी मुंबईतीलल पामबीच रोडवर भीषण अपघात, ट्रक आणि कारची धडक
नवी मुंबईतील पामबीच रोडवर आज सकाळी साडेसहा वाजता पुन्हा एकदा अपघाताचा थरार पाहायला मिळाला. ट्रक आणि कार एकमेकांना धडकून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले असून, त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालकाच्या चुकीमुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत अधिक तपास वाहतूक पोलीस करत आहेत
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या नावे ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा-सुप्रिया सुळे
महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे लाडकी बहीण योजना. आई-वडिलांच्या नंतर सर्वात मोठं नातं म्हणजे बहीण आणि भावाचं नातं. या निर्मळ नात्याचा अपमान महाराष्ट्र सरकारने केला आहे. असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा या योजनेच्या मार्फत करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात श्वेतपत्रिका काढली पाहिजे. तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेले प्रश्न काय?
२ कोटी ३८ लाख महिलांना या योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारने दिला. त्यातल्या आता २६ लाख म्हणजे दहा टक्क्यांहून अधिक महिलांना यातून वगळलं. निवडणूक झाल्यानंतर या महिलांना का वगळलं?
१४ हजारांहून अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा काय घेतला?
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पुरुषांच्या अकाऊंटवर नेमके गेले तरी कसे? अकाऊंट पुरुषांचं होतं तर महिलांचे पैसे त्या अकाऊंटवर कसे गेले? हे प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे लाडकी बहीण योजना. आई-वडिलांच्या नंतर सर्वात मोठं नातं म्हणजे बहीण आणि भावाचं नातं. या निर्मळ नात्याचा अपमान महाराष्ट्र सरकारने केला आहे. असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे.
विश्लेषण : लाडकी बहीण योजनेची सद्यःस्थिती काय आहे? खऱ्या लाभार्थींच्या पडताळणीस विलंब का होत आहे? (प्रातिनिधिक छायाचित्र)