Naxalites Killed In Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने एक मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईमध्ये १० नक्षलवादी ठार झाले आहेत. १ कोटींचा इनाम असलेल्या मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण याच्यासह १० नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच अद्याप देखील नक्षलवाद्याविरोधात सुरक्षा दलाची कारवाई सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गरियाबंद जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा म्होरक्या मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण याचाही खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. ही कारवाई मैनपूर वनक्षेत्रात नक्षल निर्मूलन मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मैनपूर वनक्षेत्रात नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ई ३०, एसटीएफ आणि कोब्राच्या संयुक्त पथकांनी नक्षलविरोधी मोहीम राबवली. आज सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून चकमक सुरू आहे. समोर समोर आलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवादी मारले गेले आहेत. या कारवाईत सीआरपीएफ कोब्रा कमांडो आणि छत्तीसगड पोलिसांचे जवान सहभागी होते.
दरम्यान, या कारवाईची अधिकाऱ्यांनी पुष्टी आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, “गरियाबंद जिल्ह्यात मनोज उर्फ मॉडेम बालकृष्ण याच्यासह १० नक्षलवादी ठार झाले आहेत. मात्र, ही कारवाई संपल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती स्वतंत्रपणे जारी करण्यात येईल.