या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : देशातील उपचाराधीन रुग्णांत मोठी घट झाली आहे. १८७ दिवसांतील म्हणजेच सहा महिन्यांतील सर्वात कमी उपचाराधीन ३ लाख एक हजार ६४० रुग्णसंख्या बुधवारी नोंदली गेली. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.९० टक्के इतकी असून मार्च २०२० नंतर प्रथमच इतकी कमी नोंदली गेली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे.

  गेल्या २४ तासांत ३१,९२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर २८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ३५ लाख ६३ हजार ४२१ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ४६ हजार ०५० झाली आहे, तर मृत्यू दर १.३३ टक्के नोंदला गेला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.७७ इतकी झाली असून मार्च २०२० नंतर प्रथमच करोनामुक्त होण्याच्या टक्केवारीत एवढी वाढ झाली आहे. आतापर्यंत ३ कोटी २८ लाख १५ हजार ७३१ जण करोनामुक्त झाले आहेत. बुधवारी १५ लाख २७ हजार ४४३ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ५५ कोटी ८३ लाख ६७ हजार ०१३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.०९ टक्के इतका नोंदला असून गेल्या २४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी नोंदला गेला आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.११ टक्के नोंदला असून गेल्या तीन महिन्यांपासून सलग ३ टक्क्यांपेक्षा कमी नोंदला गेला आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या ८३.३९ कोटी झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major reduction in patients undergoing treatment after six months akp
First published on: 23-09-2021 at 23:39 IST