Maldives History : मालदीव हा देश त्याच्या पर्यटनासाठी ओळखला जातो. जगभरातून लाखो प्रयटक भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्यामध्ये अरबी समुद्रात वसलेल्या देशामध्ये फिरायला जातात. येथील हिरवीगार बेटे आणि निळेशार पाणी अनेकांना भुरळ घालताना पाहायला मिळातात. येथील बेटांवर अनेक रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत ज्यांना जगभरातून पर्यटक भेटी देतात. पण मालदीमधील शांतता आणि सुंदरतेमागे एक मोठा अशांततेचा इतिहास राहिला आहे. तर देशाच्या भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या भारत आणि चीन या दोन बड्या शक्तींमध्ये मालदीवला आपल्या गोटात खेचण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
मालदीवच्या इतिहासामध्ये डोकावण्यापूर्वी सध्याचे याचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीव दौरा हा अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे. ही एक औपचारिक प्रसंग तर होताच याबरोबरच मोदी हे मालदीवचे सन्माननिय पाहुणे म्हणून देशाच्या ६०व्या स्वतंत्र्यदिनानिमित्त आयोजित समारंभात देखील उपस्थित राहिले. हा दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या दिवशीच भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक संबंधांना ६० वर्ष पूर्ण झाली आहेत
वाढता प्रादेशिक तणाव आणि चीनसारख्या देशाांमुळे झालेले भू-राजकीय बदल याच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि मालदीव या देशांमधील सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
बौद्ध धर्माकडून इस्लामकडे…
इस्लाम येण्याच्या आधी या देशात मोठ्या प्रमाणावर बैद्ध धर्म हा मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात पालन केले जात होते, कारण येथे बौद्ध धर्मीयांची संख्या मोठी होती. मालदीवमध्ये बौद्ध धर्माचे आगमन इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात झाल्याचे मानले जाते. तेव्हाच्या काळीतील बौद्ध स्तूप आणि मॉनेस्टरींचे अवशेष आजही मालदीवमधील अनेक बेटांवर आढळून येतात. अबू अल-बरकत युसुफ अल-बारबारी नावाचा एक विद्वान आणि इस्लामवादी व्यक्ती मालदीवमध्ये १२ व्या शतकात दाखल झाला.
मालदीवमध्ये इस्लामचा प्रसार कसा झाला?
काही इतिहास तज्ज्ञांच्या मते अल-बारबारी हा उत्तर आफ्रिकेतील होता, तर काही अंदाज व्यक्त करताता की तो इराण किंवा मॉडर्न सोमालियामधून आला आसावा. त्याने तेव्हाचे राजे धोवेमी यांना इस्लाम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर तो राजा सुल्तान मुहम्मद अल-आदिल बनला.
इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर मालदीवमधील रीतिरिवाज, संस्कृती आणि राज्य करण्याची पद्धत यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडले. याचा धार्मिक सूचनांचा सामजिक जीवनात अंतर्भाव यासह वास्तुकलेपासून ते जीवनशैलीपर्यंत सर्व गोष्टी बदलून गेल्या.
इस्लामिक सत्ता आल्यानंतर मालदीवची न्यायव्यवस्था आणि प्रशासकिय व्यवस्था यामध्ये शरिया कायदा लागू करण्यात आला. अनेक दशके मालदीव हे इस्लामिक सल्तनत म्हणून राहिले. १९६८ मध्ये जरी हा देश प्रजासत्ताक बनला असला तरी त्याचे देशाचे संविधान आणि सरकार हे अजूनही इस्लामवर आधारित आहे. इस्लाम हा मालदीवचा अधिकृत धर्म आहे, आणि हा देश एक इस्लामिक देश आहे. येथे धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि मशिदी समाजाचा अविभाज्य भाग आहेत.