पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तामिळनाडूमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळताच प्रशासकीय आढावा बैठक मध्यातूनच संपवली. “आम्हाला दु:खद बातमी मिळाली आहे. मला धक्का बसला आहे. माझे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी ही बैठक संपवत आहे,” असे त्या म्हणाल्या आणि सभेच्या ठिकाणाहून निघून गेल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ आज जनरल बिपिन रावत यांच्यासह भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. घटनास्थळावरून चार मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. सध्यातरी बिपिन रावत यांच्या प्रकृतीबद्दल ठोस अशी माहिती मिळालेली नाही. ते सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचं समोर येत आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “कुन्नूरमधून अत्यंत दुःखद बातमी येत आहे. आज संपूर्ण देश जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबीयांसह हेलिकॉप्टरमध्ये असलेल्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहे. तसेच जखमी झालेला प्रत्येकजण लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे.”

हेही वाचा – संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; १३ जणांचा मृत्यू

ममता बॅनर्जी राज्याच्या चार दिवसीय प्रशासकीय दौऱ्यावर असून, अनेक आढावा बैठका घेणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee stops meeting midway hearing about defence chiefs chopper crash vsk
First published on: 08-12-2021 at 17:05 IST