राजकारणात स्थान टिकविण्यासाठीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची फेरनिवड करण्याचे आवाहन मतदारांना केले असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
अन्य पक्षांनी ममता यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने राजकारणात स्थान टिकविण्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे, असे प्रदेश भाजपचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रात तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची ममता यांची इच्छा होती. मात्र आता समाजमाध्यमांचा वापर करून त्या नितीशकुमार यांना पाठिंबा देत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
ममता यांच्यावर भाजपची टीका
अन्य पक्षांनी ममता यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने राजकारणात स्थान टिकविण्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 27-10-2015 at 00:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamta criticise bjp